संगमनेर

भारताचा कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा विभागीय अधिवेशन

नगर दर्शन (वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे मा कॉ डॉ अजित नवले साहेब, कॉ सदाशिव साबळे, कॉ नामदेव भांगरे, कॉ एकनाथ मेंगाळ,कॉ मथुराबाई बर्डे, कॉ ताराचंद विघे यांचे उपस्थितीत मोठया उत्सहात पार पडले. या अधिवेशनासाठी संगमनेर तालुका, राहुरी तालुका, पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ ताराचंद विघे यांनी केले. यामध्ये जंगल जमीन धारक, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, इत्यादी बाबतच्या अडचणी मांडल्या.

तसेच पक्ष व इत्तर संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी कॉ सदाशिव साबळे, कॉ नामदेव भांगरे, कॉ एकनाथ मेंगाळ, कॉ राजाराम गंभीरे, दादासाहेब बागुल, लक्ष्मण कुदनर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कामगार, कष्टकरी, शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड डॉ अजित नवले साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सांगितलं आपला हा पक्ष गोरगरीब जनतेचा पक्ष असून तो आपल्या पाठीशी खम्बिर पणे उभा राहील. यासाठी आपण रस्त्यावरची लढाई लढू. मोर्चा, आंदोलन, उपोषण इत्यादीचा वापर करू.त्यासाठी आपली संघटना मजबूत असायला हवी.म्हणून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विभागीय सदस्य मंडळ निवडण्यात आले. त्यामधून विभागीय सेक्रेटरी म्हणून कॉ ताराचंद विघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली 

कॉ मथुराबाई बर्डे यांनी सर्वांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button