लोणी

पोलीस डायल ११२ वर चुकीचा कॉल केल्याने गुन्हा दाखल.

दाढ बुद्रुक येथील सागर मुळेकरवर गुन्हा दाखल

राहाता (प्रतिनिधी) :- राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील दाढ बुद्रुक येथील रहिवासी सागर मुळेकर याच्या मोबाईलवरून पोलीस डायल ११२ या नंबर वर फोन करून सांगितले की माझ्या सासर्‍याने माझ्या बायकोला जीवे ठार मारून टाकले आहे. कृपया मला मदत करा. मी दहाड बुद्रुक येथील एका मंदिरात थांबलो आहे. सदर घटना ही आत्ताच झालेली आहे. 

     सदर घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळाली. लोणी पोलीस दाढ येथे जाऊन त्यांनी सागर मुळेकर यास संपर्क केला. सदर प्रकरणाची पूर्णपणे चौकशी केली असता सागर यांनी सांगितले की माझा मोबाईल वरून माझे नातेवाईक वसंत  चव्हाण यांनी त्यांच्या नातेवाईकाला फोन करायचा आहे असे सांगून माझा नंबर वरून पोलीस डायल ११२ ला फोन केला होता. असे सागर मुळेकर यांनी लोणी पोलिसांना सांगितले.

    लोणी पोलिसांनी वसंत चव्हाण यांच्या पत्नी सीमा चव्हाण हल्ली राहणार दाढ बुद्रुक यांचे विचारपूस केली असता सदर डायल ११२ कॉल प्रमाणे असा कोणताही प्रकार घटना घडलेली नाही असे त्यांनी सांगितले. यावरून लोणी पोलिसांना असे लक्षात आले की सागर मुळेकर याने पोलीस डायल ११२ वर कॉल करून चुकीची माहिती दिली. या प्रकरणावरून लोणी पोलिसांनी आरोपी सागर मुळेकर याच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

   सदरची कारवाई ही लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी,पो. कॉ. जोसेफ साळवी, सचिन बर्डे, साईनाथ राशिनकर, पोलीस नाईक रवींद्र मेढे यांनी केली. सदर घटनेचा अधिक तपास पो. कॉ. निलेश धादवड करत आहेत.

लोणी पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्व नागरिकांनी विनाकारण पोलीस डायल ११२ वर चुकीची माहिती देऊन अफवा पसरू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button