नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी येथे सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती लोणी बुद्रुक ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने दिली.
शनिवारी 14 डिसेंबरला सकाळी मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्री म्हसोबा महाराजांचा अभिषेक होणार असून सायंकाळी चार वाजता मानाची काठीची मिरवणूक होणार आहे. शोभेच्या दारूचे आतषबाजी होणार असून रात्री तुकाराम खेडकर सह पांडुरंगमुळे यांचा लोकनाट्य तमाशा आयोजीत केला असून रविवारी सायंकाळी चार वाजता रंगारी मैदानावर जंगी कुस्तीचा हगामा होणार असून रात्री सविताराणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
सोमवारी दुपारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लोणी बुद्रुक यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.संपूर्ण यात्रा उत्सवावर सी सी टीवी कॅमेऱ्याची नजर असणार असून साध्या वेशातील पोलिसांची गस्त राहणार आहे. या यात्रेमध्ये भव्य रहाट पाळणे, महिलांसाठी विविध संसारउपयुक्त साहित्यांची भव्य दुकाने, लहान मुलांसाठी भव्य मिकीमाऊस व चक्री पाळणे, गोल पाळणे व बोटिंग ,जादूच्या प्रयोग, साहित्याची भव्य दुकान, फॅन्सी ड्रेस, चप्पल , पर्स, बांगड्या, किचन साहित्य यांचे भव्य दुकाने, भेळ, जिलेबी, रेवड्या अशा खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत.