अहिल्यानगर

ठेकेदारी संस्कृती सामान्य माणसाचा विकास करू शकणार नाही-डॉ सुजय विखे पाटील

मुख्यमंत्री काय यंदा आमदार सुध्दा होणार नाहीत!

नगर दर्शन (वृत्तसेवा):- आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे.या तालुक्यात परीवर्तन करण्यासाठी महीलांचा वाटा खूप मोठा असणार आहे. युवकांनी सुध्दा मागे न राहाता तालुक्यातील दहशत झुगारून परीवर्तनासाठी पुढे आले पाहीजे.तालुक्यातील ठेकेदारी संस्कृती तुमचा विकास करू शकणार नाही आशा शब्दात डाॅ सुजय विखे पाटील यांनी आ.बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहाणारे आमदार सुध्दा यंदा होवू शकणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

तळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डाॅ सुजय विखे पाटील यांनी थोरातांच्या चाळीस वर्षाच्या कार्यपध्दतीवर जोरदार टिका केली.वर्षानुवर्ष या भागातील महीलांच्या डोक्यावरील हांडा उतरवू न शकलेले कोणत्या विकासाची भाषा करतात असा प्रश्न करून या तालुक्यात फक्त नातेबाईकांसाठी राजकारण झाले.नाते ठैकेदार आणि जमीनीचा ताबा मिळवणारे एवढीच ओळख पद वाटताना दाखवली जाते.पण तळेगाव निमोण भागातील तरुणांनी या मातीची शान राखून परीवर्तन केले.असेच परीवर्तन आता येणार्या विधानसभा निवडणुकीत करायचे असून दोन दिवसात पक्षाचा निर्णय होवून संगमनेर विधानसभा मतदार संघाची जागा भाजपाच्या वाट्याला येईल असा विश्वास व्यक्त केला.

चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पद मिळाली.पण निधी आणता आला नाही.ना.विखे पाटील यांच्या माध्यमातून तळेगावला ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला.निळवंडे धरणाचे पाणी आले.अनेक वर्ष फक्त विखे पाटील परीवारावर टिका केली.पण साईबाबांचे आशीर्वादाने विखे पाटील कुटूबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि निळवंड्याचे पाणी आणून दाखवले आता भोजापूर चारीचे पाणी सुध्दा विखे पाटीलच आणून दाखवतील असा दावा त्यांनी करताना पुढची चाळीस वर्षे तालुक्यातील युवकांच्या उज्वल भवितव्याची असतील आशी ग्वाही त्यांनी दिली.

अनेक वर्ष एकाच घरात सता असल्याचा आरोप करून आता तुमची मनमानी बास झाली.आजची सभा तालुक्यातील परीवर्तनाची नांदी आहे.आमचा कार्यकर्ता शिवरायांचा मावळा आहे.पाकीट संस्कृतीत वाढलेला नाही.आशा शब्दात त्यांनी थोरातांच्या दहशतीचा समाचार घेतला.

यशोधनच्या सूत्रांवर विश्वास ठेवू नका- डॉ विखे

डाॅ सुजय विखेना तिकीट नाकारले आशा बातम्या जाणीपुर्वक पेरल्या.कोणत्या सूत्रांची माहीती आहे तुम्हाला माहीत आहे.यशोधनच्या सूत्रांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करून संगमनेरचा मतदार संघ भाजपाला मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button