मनोरंजन

Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच ‘या’ स्पर्धकाचं नशीब चमकलं, थेट रोहित शेट्टीसोबत…

मुंबई | 25 जानेवारी 2024 : Bigg Boss 17 चा ग्रँड फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या आठवड्याच्या अखेरीस, 28 जानेवारी रोजी या शोचा अंतिम दिवस असून ग्रँड फिनाले पार पडेल. सलमान खान हा ग्रँड फिनाले होस्ट करणार असून या सीझनचा विजेताही जाहीर करेल. मात्र त्यापूर्वी देखील या शोमधील स्पर्धकांना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी येणार आहे. एवढंच नव्हे तर तो स्पर्धकांना त्याच्या खतरों के खिलाड़ीच्या नव्या (14) व्या सीझनमध्ये सहभागी होण्याची देखील संधी देईल.

बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्येही रोहित शेट्टी सहभागी झाला होता. फिनालेपूर्वी त्याने स्पर्धकांकडून एक स्टंट करून घेतला होता. तर गेल्या शो मधील उपविजेता शिव ठाकरेला शो देखील ऑफर केला होता. तर बिग बॉस सीझन 16 ची दुसरी स्पर्धक अर्चना गौतम ही देखील रोहित शेट्टीसोबत दिसली होती. तर त्या आधी बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्येही तो आला होता, तेव्हाही घरातील स्पर्धकांनी काही स्टंट केले होते.

घरात दिसणार रोहित शेट्टीचा जलवा

सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील बिग बॉस सीझन 17 मध्येही रोहित शेट्टी घरात एंट्री करेल. या शोबद्दल ताजी माहिती देणाऱ्या एका पेजवर याबद्दल माहिती देण्यात आली. रिपोर्ट्सनुसार,रोहितने घरात एंट्री केली आणि शोमधील पाच स्पर्धकांना एक टास्क करायला लावला. आणि तो टास्क जो जिंकेल त्या स्पर्धकाला रोहित शेट्टीसोबत त्याच्या खतरों के खिलाड़ी सीझन 14 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कोण जिंकणार ?

आता बिग बॉस 17 च्या घरात मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे आणि अरुण मशेट्टी हे पाच स्पर्धकच उरले आहेत. रोहित शेट्टीच्या टास्कमध्ये त्या सर्वांनीच कठोर मेहनत करत परफॉर्मन्स दिला. आता कोण विजेता ठरणार हे शोच्या ताज्या एपिसोडमध्ये समोर येईल.

मुनव्वर फारुकीशी जुनं नातं

मुनावर फारुकीला खतरों के खिलाडी सीझन 13ची ऑफर देण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, पासपोर्टच्या समस्येमुळे तो देशाबाहेर प्रवास करू शकला नाही आणि यामुळे तो खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी होऊ शकला नाही.

लवकरच पार पडणार ग्रँड फिनाले

बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. या शोचा फिनाले आता 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या ग्रँड फिनालेमध्ये मोठी धमाल होणार हे निश्चितच आहे. सलमान खान हा होस्ट करणार असून मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे आणि अरुण मशेट्टी यांच्यापैकी कोणाला बिग बॉसची ट्रॉफी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button