मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का फेटाळले गेले…भाजप अन् अजित पवार यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप
पुणे, दि.25 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने निघाले आहे. त्यावेळी बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर मोठा हल्ला केला आहे. मराठा आरक्षण जाण्यास भाजप आणि अजित पवार जबाबदार आहेत. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा हवाला दिला. प्रकाश आंबेडकर यांच्या या आरोपामुळे आरक्षणावरील राजकारण रंगणार आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अजित पवार आणि भारतीय जनता पक्षावर प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात पॅरा ५६ किंवा ५७ मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाज श्रीमंत आहे. आमच्यासमोर तसा अहवाल आला. त्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले. हा सर्व खेळ भाजपचा आहे. अजित पवार यांचा आहे. एनसीपीचा आहे. सर्वोच्च न्यायालयापुढे असा अहवाल आला नसता तर… यामुळे यांच्यापासून गरीब मराठ्यांना सावध राहिले पाहिजे.
मनोज जरांगे ओळखतात सरकारचे चॉकलेट
सरकार चॉकेलट देत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही हे माहीत आहे. यामुळे सरकारने फसवा, फसवी करायला नको. यामुळे हा प्रश्न चिघळेल. ओबीसी आरक्षण वेगळे आणि गरीब मराठ्यांचे आरक्षण वेगळे आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणे शक्य आहे. आरक्षणासाठी दोघे एकमेकांच्या विरोधात लढत राहणार आहे, असे करु नये.
सरकारने केली अशी विभागणी
भाजपने मराठा आरक्षणाचा प्रश्न एकनाथ शिंदेवर सोडला तर फडणवीस यांच्यामार्फत ओबीसांना गोंजरले जात आहेत. यामुळे ओबीसींनी ओळखावे की भाजप हा माकडाचा खेळ करत आहे. भाजपचा डाव कोणालाच आरक्षण द्यायचा नाही. सर्वांचे आरक्षण काढण्याचा आहे. भाजप रामाचे भक्त आहेत. परंतु ओबीसीचे भक्त नाही.
मनोज जरांगे यांनी सावध व्हावे
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात तोडगा निघेल याबाबत मला शंका आहे. मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी चार जणांमध्ये जेवण नकारता पंगतीत जेवण करावे, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना दिला.