महाराष्ट्र ग्रामीण
पुण्यात पाच हजारपेक्षा जास्त शंभरीपार मतदार
पुणे : पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर अशी पुण्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. निवृत्तीनंतर अनेकजण पुण्यात स्थायिक होण्याला पसंती देतात. मालमत्ता आणि सदनिका खरेदी-विक्री व्यवहारांमधूनही ही बाब वारंवार स्पष्ट झाली आहे. नोकरी, शिक्षणानिमित्त पुण्यात आलेले बहुतांशी नागरिक पुण्यातच स्थायिक होतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, रोजगार अशा सर्वार्थाने सोयीचे असल्याने राज्यातील आणि देशभरातील नागरिकांचा पुण्याकडे ओढा असतो. पुण्याची हवा आल्हाददायक असल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून पुण्याला पसंती मिळते.
राष्ट्रपतीपदातून निवृत्त झाल्यानंतर प्रतिभाताई पाटील असो किंवा लष्करप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले अरुणकुमार वैद्य यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना देखील पुण्याची भुरळ पडली आहे.