महाराष्ट्र ग्रामीण
सोलापुरात सिध्देश्वर यात्रेत भीक मागणाऱ्या मुलांचा शोध
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेत गर्दीत भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्याचा प्रकार उजेडात आला असून जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने नऊ पीडित मुलांना ताब्यात घेऊन त्यांना बाल सुधारगृहात पाठविले आहे. सिध्देश्वर यात्रेतील धार्मिक विधी संपन्न झाले असले तरी यात्रेत अनेक करमणुकीच्या साधनांसह गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, आकर्षक खेळणी, विविध खाद्यपदार्थ व अन्य दालने सुरू आहेत. दररोज हजारो नागरिक बालबच्च्यांसह यात्रेत येतात.