दडपशाही करून सामान्य माणसाला खेटलात,आता गाठ आमच्याशी- ना.विखे
धांदरफळ घटनेमागील मास्टर माईड शोधण्याची मागणी
तालुक्यतील दडपशीहीचा चेहारा राज्याला समजला!
वसंतराव देशमुख आजही तुमच्या काॅग्रेसमध्येच
नगर दर्शन (वृत्तसेवा):- स्वच्छ सुसंस्कृत म्हणवून घेणार्याच्या दडपशाहीचा चेहरा आता राज्याला समजला आहे.भगिनीना पुढे करून राजकारण करण्याची वेळ तुमच्यावर आली.ठेकेदाराच्या जीवावर सामान्य माणसांना खेटलात आता गाठ आमच्याशी आहे.धांदरफळ घटनेमागील मास्टर माईड शोधल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
धांरफळ येथील सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यावर झालेला हल्ला तसेच वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत मंत्री विखे पाटील यांनी थोरात यांच्या दडपशाही विरोधात सडकून टिका केली.
तालुका हा सामान्य माणसाचा आहे.कोणाची मालकी यावर नाही.तालुक्यात येण्यासाठी बंदी घालता हीच तुमची लोकशाही आणि सुसंस्कृतपणा असा सवाल उपस्थित करून केवळ माफियांच्या जीवावर या तालुक्यात दहशत निर्माण केली गेली असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.
धांदरफळ येथील सभा सपल्यानंतर डॉ सुजय आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा सुनियोजित कट रचण्यात आला होता याकडे लक्ष वेधून अचानक गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे साहीत्य कसे आले.एवढा मोठा जमाव कसा जमला समाज माध्यमांमध्ये आमदारांचे बंधू स्विय सहायक आणि अन्य पदाधिकारी राजरोसपणे दिसतात अजून कोणते पुरावे पोलीसांना हवेत.यासर्व घटनेची चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
डॉ सुजय यांच्या सभांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे तालुक्याच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.धांदरफळच्या बालेकिल्ल्यात झालेली गर्दीच त्यांना अस्वस्थ करणारी होती.यातूनच परंपरेने दडपशाहीचे हत्यार त्यांनी आता काढले आहे.यापुर्वी सुध्दा कारभारी कडलग यांना झालेल्या मारहाणीचा दाखला देत हीच परंपरा सातत्याने सुरू असल्याची टिका करून आमच्या मतदार संघात येवून तुम्ही काहीही बोलायचे टिका टिपणी करायची तेव्हा लोकशाही आता इथे तुमच्या विरोधात बोलणार्यांवर हल्ले हा तुमचा सुसंस्कृतपणा का असा प्रश्न विखे पाटील यांनी विचारला.
संगमनेर तालुक्यात चाळीस वर्षात आला नाही एवढा सहाशे कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारने दिला आहे.दुधाचे अनुदान दिले.इथे तर तुमचेच पैसे वर्षभर वापरायचे आणि रिबेट म्हणून देण्याचा धंदा सुरू आहे.यंदा तर ते सुध्दा दिले नाही.
आज पर्यतच्या राजकीय सामाजिक वाटचालीत महीलांच्या संदर्भात कधीही विधान आमच्याकडून झाले नाही.तसा संस्कार आमच्यावर नाही.पण केवळ कोणाच्या तरी वक्तव्याचे खापर आमच्या माथी मारून जाणीवपुर्वक बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले.पण जनता एवढी दूधखुळी नाही.
वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध आम्ही केलाच त्यांच्यावर कारवाईची मागणी सुध्दा केली.ते आजही काँग्रेसमध्ये आहेत त्यांना तुम्हीच पक्षातून काढून टाकले पाहीजे असा पलटवार विखे पाटील यांनी केला.
मंत्री विखे पाटील यांच्याकडे आज सर्व युवक कार्यकर्त्यांनी पुन्हा डॉ सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केली.टायगर अभी जिंदा है या घोषणा देत सर्व सभागृह डोक्यावर घेतले.