नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी परिसरामध्ये महावितरणच्या कारभाराने नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. रात्री थोडा जरी पाऊस झाला किंवा पावसाचे वातावरण जरी झाले तरी रात्रभर वीज पुरवठा बंद केला जातो, तो दुसर्या दिवशीही सुरु केला जात नसून महावितरणचा एकही कर्मचारी फोन उचलत नसल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त केली आहे.
शनिवारी सकाळ पासून लोणी परिसात वीज पुरवठा बंद करण्यात आला असून आज रविवारीही गावात वीज पुरवठा बंदच असल्याने महावितरणच्या कारभारावर नागरीक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत
महावितरणने जे वायरमन कर्मचारी लोणी आणि परिसरात नेमणूकीस आहेत ते त्यांचे फोन उचलायला तयार नाहीत. जर फोन उचललाच तर फक्त उडवाउडवीची उत्तर त्यांच्याकडून मिळत असून या कारभारामुळे लहाण बालके व जेष्ठ नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतांना दिसत आहे
शनिवारी सकाळी खंडीत केलेला वीज पुरवठा रात्रभर व रविवारी दुपारपर्यंत सुरु करण्यात आला नाही. रात्रभर नागरीकांच्या घरातील वीजपुरवठा खंडीत असल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरणच्या कर्मचारी व आधिकार्यांवर या परिसरात कोणाचाही वचक राहीला नसल्याने सदर कर्मचारी व आधिकारी त्यांच्या मनाप्रमाणे कारभार करीत असल्याचे चित्र आहे. महावितरणने आपल्या कारभारात बदल करून नागरीकांना चांगली सेवा देण्याची अपेक्षा नागरीकांमधून व्यक्त होत आहे
मुळा प्रवरा वीज संस्थाच बरी होती
पाऊसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला तर मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचे वायरमन, कर्मचारी रात्रीच कुठल्याही परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत करीत होते. परंतू महावितरण आल्या पासून एकदा वीज पुठा खंडीत झाला तर बारा तास तर कधी दोन दिवसही वीज पुरवठा चालू होत नाही. त्यामुळे मुळा प्रवराच बरी होती असे नागरीक असे नागरीकांमधून बोलले जात आहे.
https://youtube.com/shorts/0DqmfvyBhRs?si=t6a47Hj5z_Aa_PO9