खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, असे आहेत आजचे दर…
नागपूर: नागपूरसह राज्यात सोन्याच्या दरांमध्ये सतत चढ- उतार होण्याचा क्रम थांबण्याचे नाव घेत नाही. २४ जानेवारीच्या रात्री २४ कॅरेट सोन्याचे दर ६३ हजार रुपये प्रति दहा ग्रामवर गेले होते. दुसऱ्याच दिवशी २५ जानेवारीच्या दुपारी हे दर घसरून ६२ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. हल्ली नागपूरसह राज्यातील इतरही भागात सोने, चांदी, हिरे, प्लाटिनम धातूपासून तयार दागिने लग्न समारंभासह विविध सनात मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून खरेदी केली जातात. दरम्यान नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २५ जानेवारी २०२४ रोजी येथे २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार १०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ९०० रुपये होता.
दरम्यान नागपुरात हे दर २४ जानेवारी २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता. हा दर १५ जानेवारी २०२४ रोजी नागपुरात २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ९०० रुपये होता. नागपूर सराफा बाजारातील व्यापाऱ्यांकडून हे दर आणखी वाढण्याचे संकेत दिले जात आहे.