महाराष्ट्र ग्रामीण
गोरेगावमध्ये गगनचुंबी इमारतीत भीषण आग; अग्निरोधक यंत्रणा बंद, पण अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील अनमोल प्राईड या गगनचुंबी इमारतीत बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास आग लागली. गोविंदजी श्रॉफ मार्गावरील या गगनचुंबी इमारतीतील गच्चीला लागून असलेल्या सदनिकेत ही आग लागली होती. या इमारतीची अग्निरोधक यंत्रणा बंद असल्याचे बचाव कार्याच्या वेळी अग्निशमन दलाच्या जवानांच्या निदर्शनास आले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.