खेळ

आवेश खानची कसोटी मालिकेतून माघार, नेमकं कारण काय ?

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test) यांच्यामध्ये पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. हैदराबाद येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीवेळी भारतीय संघाबाबत (Team India) मोठी अपडेट समोर आली आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान याला संघातून रिलिज करण्यात आले आहे. बीसीसीआयकडून याबाबात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय विराट कोहलीची रिप्लेसमेंट म्हणून निवडण्यात आलेला रजत पाटीदार भारतीय संघासोबत जोडला गेला आहे.

आवेश खानला का रिलिज केले ?

हैदराबाद कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज आवेश खान याला रिलिज केले आहे. दोन कसोटी सामन्यासाठी त्याची निवड झाली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने शानदार कामगिरी केली होती, त्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान पटकावले. पण आता पहिल्या कसोटीआधी त्याला रिलिज करण्यात आले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, रणजी सामन्यासाठी त्याला रिलिज करण्यात आले आहे. आवेश खान मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मध्य प्रदेशच्या पुढील रणजी सामन्यासाठी तो अपलब्ध असेल.

आवेश खानचं क्रिकेट करिअर

आवेश खान याने भारताकडून वनडे आणि टी20 सामने खेळले आहेत. पण त्याला कसोटी पदार्पणासाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे. कारण, इंग्लंडविरोधातील मालिकेपूर्वी त्याला रिलिज करण्यात आलेय. आवेश खान लवकरच भारतीय संघात कमबॅक करु शकतो. आवेश खान याने आतापर्यंत आठ वनडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 9 विकेट घेतल्या आहेत. तर 20 टी 20 सामन्यात आवेश खान याला 19 विकेट मिळाल्या आहेत. 18 धावा देऊन 4 विकेट ही त्याची टी 20 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. वनडेमध्येतीही त्याने एका डावात चार विकेट घेतल्या आहेत.

कसोटीच्या चमूमध्ये स्थान – 

आवेश खान याला कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या 16 जणांच्या चमूमध्ये स्थान मिळाले. याआधीही त्याची निवड झाली. पण त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे. रणजी सामन्यासाठी त्याला रिलिज करण्यात आले आहे. मध्य प्रदेशकडून तो देशांतर्गत क्रिकेट खेळतो. 2023-24 रणजी चषकात मध्य प्रदेशचे पहिले दोन सामना ड्रॉ राहिले आहेत. तिसऱ्या सामन्यात दिल्लीचा 86 धावांनी पराभव केला. आता पुढील सामन्यासाठी आवेश खान संघासोबत जोडला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button